आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

श्रावणी सोमवारनिमित्त नटराज मंदिरातील मुलनाथेश्‍वरास फळांची विशेष पुजा


सातारा : येथील नटराज मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरातील श्री मुलनाथेश्‍वराच्या शिवपिंडीस वेदमुर्ती विष्णूशास्त्री यांनी विविध फळांची आरास करून आकर्षक पुजा बांधली होती. या पुजेत सफरचंद, मोसंबी, डाळिंबी, सत्री, केळी, पेरू, द्राक्षे आदी फळांचा वापर करून सुशोभित करण्यात आली. मंदिरात दर सोमवारी सध्या भरतनाटयमही नृत्यही सादर होत आहेत.