Your Own Digital Platform

गुगलच्या चुकीमुळे UIDAI चा नंबर मोबाईलमध्ये !


स्थैर्य, फलटण (प्रसन्न रुद्रभटे): आपली अँड्रॉइड ओएस गुगल कंपनी बनवते, आपल्या रेडमी,सॅमसंग इ. मोबाईल मध्ये येण्यापूर्वी गुगल ह्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना अँड्रॉइड ओएस पुरवते आणि नंतर ह्या कंपन्या आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून मोबाईल मध्ये अँड्रॉइड ओएस इन्स्टॉल करून तो मोबाईल विकतात.

तर ह्यात झालं असं की गुगल ने 2014 साली भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना "नजरचुकीने" UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. अन तीच ओएस आपल्या मोबाईल निर्मात्यांनी इन्स्टॉल केली त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या संपर्क यादीत (Contact List) मध्ये सेव्ह झालेला दिसतो. 

ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतर च्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो.

हा कोणताही व्हायरस नसून तो कॉन्टॅक्ट तुम्हाला नको असल्यास डिलीट करू शकता.