Your Own Digital Platform

गौरीच्या स्वागतासाठी ग्रंथालय


कराड : सध्याच्या टीव्ही, मोबाईलसह धावपळीच्या युगात वाचन चळवळ जोपासली पाहिजे, असे मत अनेकजण व्यक्त करतात. काहीजण केवळ बोलतात. तर काहीजण प्रत्यक्ष कृती करतात. अशाच कुटूंबापैकी एक कुटूंब म्हणजे कराडचे तोडकर कुटुंबीय. गौरी पूजन करण्याबरोबरच त्यांनी घरात तब्बल 600 हून अधिक विविध प्रकारच्या पुस्तकांचे ग्रंथालयच साकारले आहे. 

तोडकर कुटुंबियांनी साकारलेल्या ग्रंथालयात चरित्र ग्रंथ, आत्मकथा, साहित्य, ऐतिहासिक, सांस्कृतिक, विज्ञान, आध्यात्म, अंगणवाडीतील मुलांसाठी बालमित्र ते उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक पुस्तके अशा विविध प्रकारच्या मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा समोवश आहे. रूपाली तोडकर आणि हिंदवी तोडकर या मायलेकींनी हे ग्रंथालय साकारताना मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या युगात वाचन चळवळ जोपासणे किती आवश्यक आहे ? वाचन संस्कृतीमुळे कोणते फायदे होतात ? हेच सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्‍चितपणे कौतुकास्पद असाच आहे.