मालदनमध्ये स्वाइन फ्लू संशयित रुग्णाचा मृत्यू


सणबूर : मालदन (ता. पाटण) येथील अमोल शंकरराव काळे- निकम (वय 39) या स्वाईन फ्लूच्या संशयिताचा कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल काळे यांना ताप, थंडी तसेच श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने आठ दिवसांपूर्वी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्‍ताचे नमुने तपासण्यात आले तेव्हा स्वाइन फ्लू सदृश्य लक्षणे अढळून आली. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून अमोल यांची प्रकृती जास्तच खालावली होती. 

डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी अमोल काळे यांची प्राणज्योत मालवली. अमोल यांची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची असून शासनाकडून या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी आशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. या घटणेमुळे ढेबेवाडी विभागात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य विभागामार्फत जणजागृती होणे अत्यंत गरजेचे आसल्याचे मत विभागातील जणतेने व्यक्त केले आहे.

No comments

Powered by Blogger.