कराड-विटा मार्गासाठी २५३ कोटी


कोपर्डे हवेली : जुन्या कृष्णा पुलासह कराड - विटा मार्गासाठी 253 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून दीड वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे उपअभियंता आर. एस. पन्हाळकर यांनी सांगितले.

दिपक लिमकर, महेश सुतार, अधिक सुर्वे, आनंदराव माने, नितीन आवळे, अनिल कांबळे, प्रशांत यादव हेही यावेळी उपस्थित होते. कराडमधील कोल्हापूर नाक्यापासून जुन्या कृष्णा पुलापर्यंत 120 मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे.

कराड कोल्हापूर नाका गांधी पुतळ्यापासुन हे काम करण्यात येणार असून कोल्हापूर नाका ते जुना कृष्णा पूलापर्यंत 2100 मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. कृष्णा पूल ते विटा नागज हा मार्ग काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच ओगलेवाडी करवडी फाटा ते नागजपर्यंत हा मार्ग तीन पदरी करण्यात येणार आहे.यावेळी या मार्गावर असणारे धोक्याची वळणे काढण्यात येणार आहेत.
विजापूर - गुहागर महामार्गावर जुना कृष्णा पूल आहे. हा पूल पाडण्यात येणार असून त्याठिकाणी नवीन पूल उभारला जाणार आहे. हा पूल उंच आणि रुंद व्हावा, अशी मागणी होती. नवीन पुल उंची वाढवून आठ मीटर रुंद असेल. तसेच दोन्ही बाजूला फूटपाथ असणार आहे.

कराड विटा मार्गाचे सुरु करण्यापूर्वी ओगलेवाडी ते सुर्ली घाट दरम्यान असलेल्या मार्गावरील खड्डे त्वरित मुजवावेत. तसेच या मार्गाचे काम होत असताना येथील स्थानिक लोकांना रोजगार द्यावा, अशी मागणी यावेळी प्रशांत यादव यांनी केली.

कराड विटा मार्गाचे काम करत असताना रस्त्यामध्ये येणार्‍या शेतकर्‍यांच्या खाजगी पाईपलाईन ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा संस्थांच्या पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभाग स्वखर्चाने काढणार आहे. तसेच त्या नव्याने रस्त्याच्या एका बाजूने नव्याने करून देण्यात येणार आहेत.

No comments

Powered by Blogger.