विनयभंग प्रकरणी युवकाला सहा महिने शिक्षा व दंड


लोणंद : चव्हाणवाडी ता फलटण येथील युवक पोपट भरत धोमकर याच्यावर गावातीलच महिलेचा विनयभंग प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस एम बोहरा यांच्या कोर्टात खटला चालू होता. या गुन्ह्यात सदर आरोपीस दिनांक ७ रोजी सहा महिन्यांची साधी कैद आणि दहा हजार रूपये दंड, दंड न दिल्यास आणखी दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास लोणंद पोलिस स्टेशन चे तपासी अंमलदार एस एम तोरडमल, सहा. फौजदार वाय एस महामुलकर यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एम. के. ननावरे मॅडम यांनी कामकाज पाहिले.

No comments

Powered by Blogger.