सातार्‍यात हिल हाफ मॅरेथॉनच्या ७ व्या पर्वाचा शुभारं


सातारा : पीएनबी मेट लाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या ७ व्या पर्वाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा फडकवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

या स्पर्धेत ६ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ३ हजार ५०० स्पर्धक इतर जिल्ह्यासह विदेशातील आहेत. ही स्पर्धा २१ किलोमीटर आणि हिरोज रन ही ३ किलोमीटर अशा दोन विभागात घेण्यात आली.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा निनाद, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले. मॅरेथॉन मार्गावरील नागरिक ठिक ठिकाणी धावपटूंना प्रोत्साहन देत होते. मॅरेथॉनलचा लहान मुलांसह वयोवृद्धांनी सहभाग घेऊन आनंद लुटला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.