शॉक लागून युवकाचा मृत्यू


केडंबे : वाटंबे (चारदरे), (ता. जावली) येथील मयूर सुरेश बैलकर (वय 21) या युवकाचा विजेचा धक्‍का बसून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.मयूर हा गणपती डेकोरेशनसाठी आपल्या घरी हॅलोजन बल्ब लावत असताना अचानक शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला. 

त्याला उपचारासाठी तातडीने केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान मेढा वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयूरचा मृत्यू झाल्याचे सांगितले.शुक्रवारी मयूरच्या घरी गणेशोत्सवानिमित सत्यनारायण पूजेची लगबग होती. सायंकाळी मयूर बल्ब लावत असताना ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. मयूर हा शांत, मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्‍चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.