Your Own Digital Platform

कोठडीया बंधूंना वर्गणीसाठी मारहाण; जैन समाजाच्या वतीने उद्या फलटण बंदची हाक


स्थैर्य, फलटण: येथील व्यापारी अमोल कोठडीया व अतुल कोठडीया यांना मारहाण केल्याप्रकरणी उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी फलटण बंदची हाक सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
जैन समाजातील एका मोठ्या व्यापारी बंधूंना जर गणपती वर्गणीसाठी मारहाण केली जात असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
अमोल कोठडीया यांचे उमाजी नाईक चौकात होलसेल विक्रीचे दुकान आहे ह्या दुकानात गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते येऊन आम्हाला अमुक एवढी वर्गणी द्यावी लागेल असे म्हणत मारहाण केली असल्याची चर्चा सुरू आहे. फलटण सारख्या ठिकाणी गणपती वर्गणी साठी जर आता मारहाण झाल्या प्रकरणी सकल जैन समाजाच्या वतीने फलटण बंदचे आवाहन केले आहे.