Your Own Digital Platform

विवाहितेवर बलात्कार प्रकरणी रेठरे ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा


कराड : येणपे (ता. कराड ) येथील विवाहितेवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ मृत विवाहितेचे माहेर असलेल्या रेठरे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामस्थांनी रविवारी कराड तहसील कचेरीवर निषेध मोर्चा काढला.

विवाहितेवर बलात्कार करून खून खून केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यापैकी मुख्य संशयितास अटक करून त्याची सात दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी रेठरे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामस्थांनी रविवारी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन दिले.

रेठऱ्याच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत कराडच्या कोल्हापूर नाक्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिला, युवती, नागरिक, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.