Your Own Digital Platform

मदन भोसलेंच्या बंगल्यासमोर रयत क्रांती करणार आंदोलन
सातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामाची बिले 5 सप्टेंबर पर्यंत अदा करावीत अन्यथा रयत क्रांती संघटना कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून थकीत बिलाचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जाधव, जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रकाश साबळे, खेडचे सरपंच संजय कदम, उद्धव जाधव, बाळकृष्ण जाधव, पंढरीनाथ जाधव, भरत कदम, नंदकुमार ढाणे, प्रमोद जाधव, श्रीमंत कदम, संतोष कदम आदी उपस्थित होते.

एफआरपी कायद्यानुसार ऊस कारखान्याला दिल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पैसे देणे बंधनकारक असते. असे असताना किसनवीर सहकारी साखर करखान्याने मागील हंगाम बंद होऊनही आठ महीने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. शेतकऱ्यांवर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी 31 ऑगस्ट पर्यंत देणी देण्याचे सांगितले. मात्र अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे 5 सप्टेंबर पर्यंत जर शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर भोसलेयांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन हे के