Your Own Digital Platform

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का


पाटण : कोयना धरण परिसरासह पाटण तालुक्यात गुरुवारी (दि. 27)दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्याने तालुक्यात कोठेही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

 तसेच कोयना धरण पूर्णवणे सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून गोषटवाडी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची भूगर्भातील खोली 7 किलोमीटर अंतरावर होती.