जि.प.केंद्रशाळा जावली शाळेची पाझर तलाव व धुमाळ फार्म हाऊस येथे क्षेत्रभेट


जावली केंद्रशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी श्रावणी सहलीच्या निमित्ताने पाझर तलाव व धुमाळ फार्म हाऊस परिसरात भेट दिली.

यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीर गाईंचा गोठा व वुडन हाऊस (लाकडी बांबुपासुन बनविण्यात आलेली घरे) यांची पाहणी केली. तसेच झाडे लावा, झाडे जगवा व पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात लावण्यात आलेल्या आंबा,चिंच ,पेरू,चिकु,करवंद इत्यादी वृक्षांची माहिती घेतली.

वेगवेगळे वृक्ष व परिसर पाहुन सर्व विद्यार्थी आनंदित झाले. त्याचप्रमाणे परिसरातील पक्षी व प्राण्यांचेही निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

मा.धुमाळ साहेब यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मेंढपाळ श्री.भाऊसाहेब कदम व विनायक कदम कदमवाडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच पर्यावरण पुरक उपक्रम म्हणून विद्यार्थी व शिक्षकांना विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश मकर व मामा बुधावले यांनी शिक्षक व विद्यार्थी मित्रांना जुना तलाव त्याची व्याप्ती व संपूर्ण परिसराची माहिती दिली.

सदरच्या कार्यक्रमास जावली गावचे सुपुत्र व व्यंकटेश अॅग्रोचे व्यवस्थापक मा.इंद्रजित मोरे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थी व शिक्षकांनी पाझर तलाव परिसरातील सौदर्यांचा आस्वाद घेऊन आनंद व समाधान व्यक्त केले.

यावेळी जावली केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री बागल सर,शिवाजी मोरे सर,कल्याण वाघमोडे सर,खांडेकर सर,जगताप सर,बनकर सर, पवार डिजीटलचे श्री.बजरंगनाना पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

एक आगळावेगळा उपक्रम राहिल्यामुळे सर्वचं शिक्षकांचे जावली ग्रामस्थांच्याकडुन मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

No comments

Powered by Blogger.