सह्याद्री कारखान्याच्या विस्तारवाढीसाठी न्यायालयात जाणार : बाळासाहेब पाटील
कराड : सह्याद्री साखर कारखान्याचा विस्तार काळाची गरज आहे. त्यामुळे आपण स्वत: राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन कारखान्याची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. तरी देखील सहकारमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कारखान्याकडे कायदेशीर मार्गाने दाद मागण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसून सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना आमदार बाळासाहेब पाटील यांनी न्यायालयात जाण्याबाबतचे संकेत दिले आहेत.
कारखान्याची गेल्या दहा वर्षातील गळीत हंगामाची सर्व माहिती आपण दिली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचही तालुक्यातील ऊस उत्पादनाची माहिती सादर केली आहे. वेळेत ऊस गाळप होण्यासाठी विस्तारवाढ गरजेची आहे. विस्तारवाढ झाल्यानंतर शेतकर्यांना दिलासा मिळणार असूनही सहकारमंत्री ठोस भूमिका घेत नाहीत. इतरांना परवानगी दिली जाते, मात्र सह्याद्रिला परवानगी मिळत नसल्याने आता कायदेशीर लढाई उभारणे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
Post a Comment