सातार्याचे खासदार उदयनराजे डान्स करताना अनेकांनी पाहिले आहेत. मात्र, आमदार शिवेंद्रराजे यांना जाहीरपणे डान्स करताना कुणी पाहिले नव्हते. चाहत्यांची ही इच्छा आमदार शिवेंद्रराजे यांनी रविवारी पुरवली. गांधी मैदानावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरवलेल्या छत्रपती दहीहंडी महोत्सवात शिवेंद्रराजे बेभान होऊन नाचले. तरुणांच्या तोबा गर्दीत सुरू झालेल्या या महोत्सवात ‘मैं हूँ डॉन, शहेनशहा, मरहब्बा’ या गाण्यावर शिवेंद्रराजे जाम नाचले. त्याला तरुणांनी दाद दिली. ‘जादूची झप्पी’ देऊन शिवेंद्रराजे नाचत होते. ते पाहताना तरुणांत उत्साह संचारला.
Post a Comment