Your Own Digital Platform

गणेशमूर्तीवर शेवटचा हात


आरडगांव : गणेश प्रतिष्ठापना दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कुंभार समाजाची गणेशमूर्तीवर हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे.गणेशमूर्तीची सुबकता व देखणेपणा जपण्यात यशस्वी झालेल्या तांबवे ता.फलटण येथील गणेश कुंभार यांच्या गणेशमूर्ती वाई, सातारा ,पाचगणी, वेळापूर, बारामती, भोर, कराड, दहिवडी, अकलूज ,खंडाळा, नीरा, लोणंद व परिसरात मोठया प्रमाणात विक्रीसाठी जात आहेत.

 तांबवे येथील गणेश कुंभार यांचे शिक्षण जीडी आर्ट झालेले असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय स्वतच्या गावातचं करण्याचे ठरवले , पत्नीला बरोबर घेऊन गणपती, गौरी बनविण्याचा छोटा व्यवसाय ऊजाड माळरानावर सातारा लोणंद रस्त्याच्या ऊजव्या बाजूस सन २०१० साली सुरु केला.

पत्नी करत असलेल्या व्यवसायातील मदतीमुळे हा व्यवसाय छोटा न राहता मोठा झाला आहे, पुर्ण वर्षभर काम केले तरी बनविलेल्या मुर्ती कमीच पडत आहे. - गणेश कुंभार तांबवे 

कुंभार बांधवाची व्यवसायातील ख्याती सातारा जिल्हाला आहे. त्यामुळेच आतापासुनच अगदी घरगुती गणेशमुर्तीपासुन मंडळाच्या मोठया आकर्षक मुर्ती खरेदीसाठी तांबवेकर यांच्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्योची वर्दळ वाढु लागली आहे. या वर्षी रंगाचे व प्लॅष्टर ऑफ पॅरीसचे भाव वाढले आहेत. तसेच जीएसटीमुळे दरात काही प्रमाणात वाढ अपेक्षीत असल्याचे कुंभार कुटुंबीय यांनी सांगितले.

  सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी निराश न होता, स्वताचा छोटा मोठा लघुऊदयोग सुरु करावा, नोकरीच्या मागे कोणीही लागु नये, जिद्दीने, व प्रामाणिकपणे कष्ट केले तरं हमखास व्यवसायात यश मिळते. -शर्वरी कुंभार 

लघुऊद्योजिका तांबवे अडीचशे रुपयापासुन ते सत्तर हजार रुपयापर्यंत मुर्तीच्या किमती असल्याचे, व जास्तीत जास्त चौदा फुटापर्यंतची गणेशमुर्ती बनवित असल्याचे ते म्हणाले, गेली वर्षभर येथे गणेश मुर्ती बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. विष्णु कुभार, विनायक कुंभार, अर्जुन कुंभार, गोरख कुंभारआदी कलाकार रात्रंदिवस येथे कामात गुंतल्याचे दिसत आहे.