नरेंद्र पाटील यांनी दिला राष्ट्रवादी सदस्यपदाचा राजीनामा


ढेबेवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविला आहे. याबाबत नरेंद्र पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

नरेंद्र पाटील यांची नुकतीच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपलेले आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पाठवला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये असताना आपण दिलेले सहकार्य आणि पाठबळाबद्दल मी आभारी आहे, असेही शरद पवार यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.