मायणीत विघ्नहर्त्याचे उत्साहात आगमन


मायणी : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन मायणी व परिसरात अत्यंत उत्साहाचे व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले . मायणी मध्ये सुमारे दहा ते बारा लहान- मोठी गणेश मंडळे आहेत.सकाळपासूनच विविध मंडळे आपल्या मंडळांच्या गणेशमूर्ती वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत आपल्या मंडळाच्या ठिकाणी नेत होते.त्याच प्रमाणे मायणी येथून लहान- मोठ्या गणेशमूर्ती इतर गावीही नेल्या जात होत्या.

ठिक ठिकाणी मंडळांनी भव्य मंडप , आकर्षक विद्युत सजावट व विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . मायणीतील बजरंगबली गणेश मंडळाची बारा फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. बाजार तळावर पूजा साहित्य, सजावट साहित्य व गणेशमूर्तींच्या विक्रीचे स्टॉल लावले होते. त्या ठिकाणी व इलेक्ट्रिक वस्तूच्या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सर्वच वस्तू व गणेश मूर्तीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

No comments

Powered by Blogger.