Your Own Digital Platform

मुंजवडी येथील आरती घोरपडे हीची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


राजुरी  : मुंजवडी ता. फलटण येथील आरती मोहन घोरपडे हिने 17 वर्षे वयोगटाखालील 43 किलो वजन गटात तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पानीव ता. माळशिरस येथे करण्यात आले होते. आरती घोरपडे हीने येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत एकतर्फी विजय संपादन केला आहे. तर ती हनुमान विद्यालय व ज्यूनियर काॅलेज शिंदेवाडी ता. माळशिरस येथे शिक्षण घेत आहे. तर कुस्ती सराव राजुरी येथील कर्मवीर कुस्ती आखाडा येथे करत आहे. या कुस्ती आखाड्यात वस्ताद पै. नवनाथ खुरंगे पैलवानास मार्गदर्शन करतात. तर या तिच्या यशाबद्दल प्राचार्य सोळंखे व क्रिडा शिक्षक एस. वाय. जाधव, मुंजवडी गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.