Your Own Digital Platform

प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद येथे स्वाइन फ्लूविषयी कार्यशाळा


लोणंद : प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद ता. खंडाळा येथे " स्वाइन फ्लू विषयी कार्यशाळा " पार पडली. या कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील यांनी स्वाइन फ्लूचे बद्दल शासनाचे नवीन परिपत्रक बद्दल माहिती देऊन *मार्गदर्शक सूचनांचे* उपस्थित सर्व डॉक्टरांशी चर्चा केली.

यामध्ये रुग्णांची उपचार करताना घ्यावयाची काळजी तसेच सौम्य, मध्यम व अत्यावस्थ रुग्णाच्या उपचाराबद्दल माहिती दिली. ज्या हिवतापाच्या रुग्णांना दोन दिवसांमध्ये बरे वाटत नसेल अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये अथवा तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने *स्वाईन फ्लू साठी उपचार* सुरू करावीत तसेच अति जोखमीचे जे रुग्ण आहेत.

 म्हणजेच पाच वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता व ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार तसेच फुफ्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असतील किंवा ज्यांना प्रतिकारशक्ती कमी आहे अशा सर्व रुग्णांना स्वाईन फ्लूचा उपचार सुरु करणे आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या रुग्णांवर वरती आपण उपचार करणार आहोत त्याची माहिती आपल्याजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व जिल्हा रुग्णालय याठिकाणी कळवावे असे डॉक्टर अविनाश पाटील यांनी माहिती देताना सूचना केली. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून विलगीकरण कक्षाची स्थापना करावी व अशा ठिकाणी स्वयं फ्लूचा रुग्णाचे उपचार करावेत.

या कार्यशाळेसाठी उपस्थित डॉक्टर किशोर शिंदे, अध्यक्ष लोणंद मेडिकल असोसिएशन तसेच डॉक्टर प्रताप गोवेकर, डॉक्टर नानासाहेब हडंबर, डॉक्टर तात्यासाहेब कोकरे, डॉक्टर किशोर बूटियाणी,डॉक्टर राहुल क्षीरसागर, डॉक्टर स्वप्नील यादव, डॉक्टर अविनाश शेळके,डॉक्टर द्वारका अडसूळ, डॉक्टर नितीन सावंत उपस्थित होते.