देशभक्त किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


कवठे : “किसन वीर’ कारखान्याचे संस्थापक तसेच सातारा जिल्ह्याचे थोर शिल्पकार क्रांतिवीर किसन वीर यांची 113 वी जयंती 2 सप्टेंबर रोजी असून या निमित्ताने वाई पंचायत समिती वाई यांच्यावतीने वाई येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किसन वीर यांच्या कवठे ता. वाई या गावी येथील किसन वीर स्मारक सभागृहात ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे तसेच आमदार मकरंद पाटील व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा बॅंकेचे माजी चेअरमन सुरेश वीर, संचालक नितीन पाटील, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, वाई सूतगिरणी चेअरमन शशिकांत पिसाळ, व्हा. चेअरमन नारायण जाधव, जिल्हा परिषद सदस्य संगीता मसकर, पंचायत समिती सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, सदस्य मधुकर भोसले, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महादेव मसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कवठे परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे.

“किसन वीर’ कारखान्यातर्फे प्रतिवर्षी किसन वीरांच्या जयंतीनिमित्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदाचा पुरस्कार हा वनाधिपती व माजी मंत्री विनायक पाटील यांना प्रदान करण्यात येणार असून आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार हा सह्याद्री फार्मसप्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे यांना देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सिक्कीम राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापराव भोसले, महाराष्ट्र वैधानिक महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, कारखाना चेअरमन मदनदादा भोसले, व्हा. चेअरमन गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोक जाधव तसेच जिल्हा कॉंग्रेसचे आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.

No comments

Powered by Blogger.