Your Own Digital Platform

भारत बंदला रहिमतपूरात उस्फुर्त प्रतिसाद
रहिमतपुर ( अविनाश कदम) : सर्व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या भारत बंद मध्ये सहभागी होण्याची आव्हानाला प्रतिसाद देऊन रहिमतपूरातील व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवून रहिमतपुरात 100 टक्के खडकडीत बंद यशस्वी केला .

या बाबत अधिक माहिती अशी सध्या डिझेल पेट्रोल चे भाव गगणाला भिडले आहेत दररोज डिझेल पेट्रोल चे दर वाढत आहेत . त्याचा परिणाम म्हणून महागाईचा भडका उडाला आहे.या मुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.वाढते पेट्रोल डिझेल ची दर वाढ व महागाई कमी करण्यासाठी अखिल भारतीय विरोधी पक्ष्यांनि विशेत: राष्ट्रीय काँग्रेस ने भारत बंद ची हाक दिली त्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस साथ दिली. राष्ट्रीय काँग्रेस ने गांधी मैदान ते बस स्थानक पर्यंत रयली काढली या रॅली मध्ये मोटर सायकल, रिक्षा, यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता.