Your Own Digital Platform

म्हसवडमध्ये मुनिश्री तरुणसागर यांना विनयांजली


म्हसवड :
प. पू. राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागर महाराज यांची आज शनिवारी पहाटे सल्लेखनापूर्वक समाधी झाली. त्यांना म्हसवड येथील सकल जैन समाजाच्या वतीने भावपूर्ण विनयांजंली वाहण्यात आली.

प. पू. आ. श्री. पुष्पदंत सागरजी महाराज यांचे परमशिष्य, भारतीय संस्कृतीचे व जैन तत्वज्ञानाचे सखोल प.पू.राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागर महाराज यांची सल्लेखनापूर्वक समाधी झाली. त्यांना म्हसवड येथील जैन समाज बांधवांच्या वतीने व्यापारी पेठ बंद ठेवून विनयाजंली वाहण्यात आली. यावेळी समाजाच्या वतीने शहरातून फेरी काढण्यात आली. महावीर चौकातून सिध्दनाथ चौक – महात्मा फुले चौक- बसस्थानक चौक-सातारा-पंढरपुर रोड-मार्गे मेनपेठेतून ही फेरी काढण्यात आली. यावेळी सकल जैन समाज सामील झाला होता.

महाराजांना भावपूर्ण विनयाजंली वाहताना समाजातील जवाहिर गांधी, भरतशेठ दोशी, भारतलाल गांधी, सुकुमार गांधी, महावीर व्होरा, अनिल देशमाने, अरिंजय शहा आदीनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुनिश्री तरुण सागर महाराज हे जैन तत्वज्ञानाचे सखोल अभ्यासक आणि सहज सुलभ भाषेतील विश्‍लेषक होते. संपूर्ण समाजाला जागृत करण्यासाठी सातत्याने धडाडणारी एक असामान्य, अहिंसामय तोफ आज शांत झाली अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.