सदगुरु शिक्षण संस्थेच्या जिजामाता बालक मंदिर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिजामाता महोत्सवास पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद


कोळकी : फलटण येथील श्री. सदगुरु शिक्षण संस्थेच्या जिजामाता बालक मंदिर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिजामाता महोत्सवास पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला व चिमुकल्यांचे कौतुकही केले.
या महोत्सवाचे उदघाटन संस्थेच्या सचिव व नगरसेविका सौ .मधुबाला भोसले यांचे हस्ते झाले. या प्रसंगी बालक मंदिर च्या कमिटीच्या अध्यक्ष सौ. मृणालिनी भोसले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्रशासकीय संचालिका सौ.प्रियदर्शनी भोसले, सौ. वर्षा पतंगे, आनंदवन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात मुलांनी खाद्यपदार्थ ,भाजी मंडई आदींचे स्टॉल, विद्यार्थ्यांनी बनविलेले कार्यानुभव अन्तर्गत विविध वस्तू ,चित्रे आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच वर्ष भर साजरे करण्यात येणारे सण ,उत्सव यांची माहिती व त्यांच्या प्रतिकृती यांचे प्रदर्शन हि भरविण्यात आले होते.

सौ.मधुबाला भोसले म्हणाल्या, या उपक्रमामुळे मुलांना व्यवहारज्ञान,सृजनशीलता निर्माण होणार असून सुप्तकलागुणांना वाव मिळणार आहे.

यावेळी पालक, व परिसारतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे ,चिमुकल्यांचे कौतुक केले .महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सौ. स्वप्नाली पटवर्धन,सौ. मोनाली गोसावी, सौ. स्वाती गाटे,सौ. सविता चोरमले, सौ. कल्पना साळुंखे, सौ. रुक्मिणी बोबडे, सौ.चित्राली बोबडे यांनी परिश्रम घेतले.

No comments

Powered by Blogger.