Your Own Digital Platform

डॉल्बीमुक्तीसाठी लोणंद परिसरातील २६ गणेश मंडळांचा एकमुखी ठराव


लोणंद : लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 26 गावांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे ठराव दिले आहे. विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर लोणंद गावातील डॉल्बी साहित्य सील करण्यात आले आहे. तर शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी 7 जणांना तडीपार, 13 जणावर प्रतिबंध कारवाई करण्यात आली आहे. गणेश मंडळांनी गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन, सपोनि गिरिश दिघावकर यांनी दिली.लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून अमोल ढोणे, प्रविण शेळके, निलेश गोवेकर, गणेश भालेराव, सागर खताळ, राकेश माने, प्रविण दुरगुडे यांना तडीपार करण्यात आले आहे. याचबरोबर लोणंद येथील बाजार तळावरावरील अमोल शहा यांचे मालकीचे डॉल्बी साहित्य सील करण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून 13 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर एक जणाचा तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. तर लोणंद व परिसरातील 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात जुगार अंतर्गत पाच जणांवर कारवाई करून 42 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तर अवैध दारू विक्रीप्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहे. गणेशोत्सव विर्सजन मार्गाची पायी पेट्रोलिंग करून पाहणी करण्यात आली आहे.