युवा मोरया सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न


सातारा : गणेश मंदिर, राणाप्रतापनगर, सैदापुर ता. सातारा येथे युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल राजपुरोहित यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांचे सहाय्यक शिरीष जाधव यांच्या उपस्थितीत वड, पिंपळ, गुलमोहर, अशोक, कडूलिंब या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

डॉ. शिरीष जाधव साहेब यांनी या उपक्रमाप्रसंगी सामाजिक क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले तसेच युवा मोरयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करुन शासन स्तरावर सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन युवा मोरयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमास जिहे-कटापुर सहकारी सोसायटीचे माज़ी चेअरमन मा. श्री. अनिल केंजळे साहेब, युवा मोरयाचे अध्यक्ष मा. विक्रांत देशमुख, सचिव अभिषेक कचरे, वरिष्ठ पदाधिकारी रमेश बोराटे साहेब, वैभव इंगवले, नमित गांधी, तेजस हांगे, प्रफुल्ल सावंत उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी राणाप्रतापनगर व अवधूतनगर मधील रहिवाशांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले.

No comments

Powered by Blogger.