कोरेगावमधील टेंडर शाही चालू देणार नाही : उदयनराजे


सातारा : माझ्या वाढदिवसाला राष्ट्रवादीचे आमदार आले नाहीत ते बरे झाले. ते न आल्यानंतरही गर्दी झाली होती. अन्यथा ही गर्दी मीच जमवली असे ते म्हणाले असते. लक्षात ठेवा कोरेगावमध्ये घरा घरात काठ्या कुऱ्हाडी आहेत. कोरेगावात टेंडरशाही चालू देणार नाही, असा हल्ला बोल खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर केला.एकसळ (ता. कोरेगाव) येथे आमदार शिंदे यांच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी त्यांच्याशी उदयनराजे यांनी चर्चा केली. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, एकच खंत आहे की, कोरेगावकर एकत्र येत नाहीत. तुम्ही सर्वांनी एकत्र यावे मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय हा फक्त आमदारकी नाहीतर खासदारकीलाही लागू होतो. माझ्या वाढदिवसाला जिल्हा परिषद मैदानावर बरं झाले आमदार आले नाहीत. नाहीतर म्हणाले असते की, मीच गर्दी जमवली म्हणून. लक्षात ठेवा प्रत्येक कोरेगावकरांच्या घरात काठ्या कुऱ्हाडी आहेत. यापुढे तुमची टेंडरशाही चालू देणार नाही.

No comments

Powered by Blogger.