Your Own Digital Platform

मुधोजी हायस्कूलमध्ये माध्यमिक स्तरावर निंबध स्पर्धेचे आयोजन


फलटण : मराठा समाज विकास फौडेशनच्यावतीने शालेय उपक्रमा अंतर्गत येथील मुधोजी हायस्कूल येथे माध्यमिक स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.तालुक्यातील अनेक शाळांच्या विदयार्थ्यांनी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मराठा समाज विकास फौडेशनची फलटण येथे नुकतीच स्थापना झाली असून रविंद्र बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था काम करते आहे.शालेय विदयार्थ्यांसाठी उपक्रम म्हणून येथील मुधोजी हायस्कूल येथे इ.६,७ वी या गटासाठी जाणता राजा - छत्रपती शिवाजी महाराज,पर्यावरणाचे महत्व आणि अंधश्रध्दा या विषयावर निबंध स्पर्धा झाली.

शहरातील विविध शाळांच्या सुमारे २०० विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला.विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक,तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात येणार आहे.

संस्थेचे सचिव सुर्यकांत पवार,सदस्य श्री.भोईटे,प्रमोद सस्ते यांनी केंद्र संयोजन केले.राजेंद्र सस्ते,सोनाली पवार,वैशाली रसाळ,जयश्री ढोक,संयोगिता जगताप,प्रज्ञा कदम यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.