Your Own Digital Platform

श्रीराम विदयाभवनच्या विदयार्थ्यांनी श्रावण सहलीचा मनसोक्त आनंद लुटला


फलटण : श्रावण सरी अंगावर घेत श्रीराम विदयाभवनच्या विदयार्थ्यांनी फलटणच्या दक्षिणेकडील जाधववाडा,धुमाळवाडीचा निसर्गरम्य परिसर अन् पायथ्यापासून वारूगडची मजल दरमजल करत केलेली डोंगर सफर अनुभवत श्रावण सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.

श्रावण महिन्याच्या अंतिम टप्यात फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विदयाभवन प्राथमिक शाळेतील विदयार्थ्याची श्रावण सहल जाधववाडा,धुमाळवाडी व वारूगड याठिकाणी नेण्यात आली.शंभर विदयार्थ्यांनी श्रावण सहलीचा आनंद घेतला.

सकाळी सकाळी विदयार्थ्यांनी गिरवी नाका येथून गिरवीमार्गे एसटी बसने प्रवास करून जाधववाडा येथे पोचले.हा भाग डाळिंबाचे माहेरघर म्हणून समजला जातो.येथील डाळिंब बागांसह लगतच्या महादेव डोंगररांग आणि त्यावरील हिरवागार निसर्गरम्य परिसर पाहत मुलांनी जाधववाडाच्या पायथ्यापासून डोंगराची वेडीवाकडे वळणं घेत अर्धा पाऊणतास डोंगर सफर करत वारूगड चढला.वारूगडाची एेतिहासिक माहिती घेत ग्रामदैवत महादेवाचे दर्शन घेतले आणि श्रावण सहलीचा मनमुराद आनंद घेतला.

बाळासो भोसले,किशोर पवार,सुनिल डावखर,विजया भोसले आणि शमीम शेख या शिक्षकांनी श्रावण सहल यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.