आसू परिसरातील मल्लांनी जिल्हास्थरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड


आसू : आसू येथील जय नितीन शेडगे,तेजेस नितीन शेडगे या दोन सख्या भावांची,तर गोखळीच्या श्रुती गेजगे आणि मुंजवडीच्या आरती घोरपडे या आसू परिसरातील मल्लांनी जिल्हास्थरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

भुईज येथे झालेल्या जिल्हास्थरीय पुरूष कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वय आणि ५१ किलो वजन गटात जय नितीन शेडगे यांनी,तर १४ वर्षे वय आणि ४१ किलो वजन गटात तेजेस नितीन शेडगे या ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी भाग शाळा आसूच्या विदयार्थ्यांनी,तर महिला कुस्ती स्पर्धेत हनुमान विदयालय गोखळी येथील १४ वर्षे वय आणि ४१ किलो वजन गटात श्रुती दादा गेजगे यांनी प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणारया विभागीय स्पर्धेसाठी या सर्वांची निवड झाली आहे.

तसेच पानीव ता.माळशिरस येथे झालेल्या जिल्हास्थरीय महिला कुस्ती स्पर्धेत मुंजवडी येथील आरती घोरपडे यांनीही १७ वर्षे वय आणी ४३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.ती हनुमान विदयालय शिंदेवाडीची विदयार्थीनी आहे.

यशस्वी मल्लांना वस्ताद बाळासाहेब साबळे,अजित शेलार,पै.नवनाथ खुरंगे,एस.वाय.जाधव यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विदयार्थ्यांचे सातारा जिल्हा बंकेचे संचालक दादाराजे खर्डेकर,उदयोगपती बंटीराजे खर्डेकर, फलटण पंचायत समितीचे उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर,जिल्हा परिषद सदस्या सौ.उषादेवी गावडे,आसूच्या सरपंच सौ.आशा फाळके,प्रमोद झांबरे,महादेव सकुंडे,हरीभाऊ सपकळ,शिवाजीराव शेडगे,

आबासाहेब जाधव,शिवाजीराव माने,अशोक गोडसे,

बाळासाहेब मोरे,प्राचार्य श्री.भुजबळ उपप्राचार्य श्री.खुरंगे,दत्ता साबळे,सतीश भोसले,

गोखळीचे सरपंच अमित गावडे,माजी सरपंच नंदकुमार गावडे,प्राचार्य डी.एन.भिवरकर,शिंदेवाडीचे प्राचार्य सोळंखे आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.