गिरवीत वडील-मुलीचा निघृण खून, फलटणमधील घटना


फलटण : गिरवी (ता. फलटण) येथे वडील व मुलीचा निर्घृण खून झाला असून या घटनेनंतर संशयिताने विषारी द्रव्‍य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गिरवीसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.किरण उर्फ पका भुजंगराव कदम (वय ३२) व त्यांची मुलगी कार्तिकी किरण कदम (वय ३ ) यांचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे खून केला. संशयित आरोपी आकाश सदाशिव कदम असे त्याचे नाव आहे. या कृत्यानंतर मात्र संशयिताने विषारी द्रव्‍य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 
 
किरण कदम हे सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असताना हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस गिरवी येथे पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.

No comments

Powered by Blogger.