Your Own Digital Platform

तांबवेमध्ये कर्मवीर जयंती ऊत्साहात


आरडगांव : दिन दलीत, गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणुन ज्यांनी शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली, शासनाला ज्या ठीकाणी शाळा काढता आल्या नाहीत अशा डोंगर कपाऱ्याच्या पायथ्याशी शाळा सुरु केल्या,आपले पुर्ण आयुष्य गोरगरीबांना शिक्षण घेता यावे यासाठी झिझवले ते बहुजनांच्या शिक्षणाचा आधार, सत्यशोधक परखड विचारवंत, शिक्षणमहर्षी, निश्चयाचे महामेरू,रयनेचे दिपस्तंभ, मानवतेचा वटवृक्ष व साम्यवादी विचाराचे प्रणेते पद्य भूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ( अण्णा ) यांची जयंती तांबवे येथील श्रीमानशेठ गणपतराव सुर्यवंशी विद्यालय तांबवे ता. फलटण येथील विद्यालयात ऊत्साहात साजरी करणेत आली. ढोलताशा, लेझीम, टीपरी, झांझपथकाच्या गजरात, कर्मवीर भाऊराव पाटील नामाचा जयघोष करत, शिक्षणाचा संदेश देत तांबवे गावातुन कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या प्रतिमेची वाजत गाजत विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुक काढणेत आली. यावेळी विद्यार्थ्याच्यासमवेत शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित सर्वाच्यावतीने अभिवादन करणेत आले.