Your Own Digital Platform

साताऱ्यात नो डॉल्बीसाठी रॅली; हजारो विद्यार्थी सहभागी


सातारा :अनंत चतुर्थीदिवशी डॉल्बी लागणार की नाही सर्वांच्या या उत्सुक्तेला हायकोर्टाने पुर्णविराम दर्शवला आहे. डीजे, डॉल्बीला परवानीगी द्यायची की नाही यासंदर्भात हायकोर्टातील सुनावणी संपली. यात न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून डीजे, डॉल्बी वाल्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. राज्य सरकारने डिजेला परवानगी देण्यास तीव्र विरोध केला. या नो डॉल्बीला पाठिंबा साताऱ्याच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून दर्शवला आहे.

आज दुपारी ४ वाजता सातारा पोलीस दलाने डॉल्बी विरोधी रॅली चे आयोजन केल्यानंतर त्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कर्ण कर्कश आवाजाने येणारे हृदयविकाराचे झटके, कायमचा बहिरेपणा, लहान मुले व वृद्ध यांच्यावर होणारा परिणाम, चिडचिडापण, हादऱ्याने पडणाऱ्या भिंती या दुष्परिणामावर बॅनर, पोस्टर हातात घेऊन लोकजागरण करण्यात आले. दरम्यान या रॅलीची सुरुवात पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रीन सिग्नल दाखवून ते स्वतः या रॅलीत सहभागी झाले.

त्यानुसाठी बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासूनच तालीम संघावर विविध शाळेतील मुले जमली. सव्वा चार वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीला सुरुवात झाली. रस्त्यावरून जाताना विद्यार्थी डॉल्बी विरोधात घोषणाबाजी करत होते. मुलांनी यावेळी डॉल्बी विरोधातील विविध बॅनर पोस्टर तयार करून ते हातात घेतले होते. यावेळी समस्त सातारकरांनी या रॅलीला प्रतिसाद दिला.