कु. शुभांगी मोरे हिचा वांग व्हॅंली पत्रकार संघाच्यावतीने सत्कार


ढेबेवाडी : मोरेवाडी ( कुठरे) ता. पाटण येथील कु. शुभांगी मोरे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. राज्य शासनाकडून घेण्यात येणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये तिची सहा. पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्धल वांग व्हॅंली पत्रकार संघाच्यावतीने शुभांगी मोरे हिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण, अध्यक्ष संजय लोहार, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, नितीन बेलागडे, कार्याध्यक्ष तुषार देशमुख, खजिणदार हरीश पेंढारकर, माजी सरपंच विष्णु सपकाळ, सदाशिव मोरे, यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत चव्हाण म्हणाले, शुभांगी मोरे हिने प्रतीकुल परीस्थीतीवर मात करत स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. मोरेवाडी सारख्या छोट्या खेड्यातून शिक्षण घेत चांगले यश संपादन केले असून युवा पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. अध्यक्ष संजय लोहार म्हणाले, जि. प. च्या मराठी माध्यमांसारख्या शाळेतून शिक्षण घेत आपल्या जिद्दीच्या ज़ोरावर शुभांगीने यश मिळवत वडीलांसह सर्व कुटुंबियांचे स्वप्न साकार केले आहे. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी शुभांगीने अतीशय खडतर प्रवास करून कुटूंबासह आपल्या गावाच्याही नावलौकीकात भर घातली आहे.

सत्कार प्रसंगी शुभांगी मोरे म्हणाली, मी शासकीय अधिकारी व्हावे हे माझ्या वडीलांचे स्वप्न होते. त्यासाठी माझ्या आई-वडीलांनी फार कष्ट केले आहेत. कोणत्याही परिस्थितित अधिकारी व्हायचच या जिद्दीतून घरापासून दूर खानेदेश-ज़ळगाव येथे जावे लागले. खडतर धेय्य समोर ठेवून कठीण परीस्थितीवर मात केल्यानेच या यशापर्यंत पोहचता आले. यासाठी मला आई-वडिलांसह सर्व कुटुंबातील सदस्यांनी दिलेले प्रोत्साहन मोलाचे ठरले. प्रत्येक कुटूंबातील आईवडीलांनी आपल्या मुलांमधील कौशल्य ओळखुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी. तसेच त्यामध्ये यश मिळेपर्यंत बळ व प्रोत्साहनही देणे तितकेच गरजेचे आहे.

कार्यक्रमास पत्रकार बाळासो रोड़े, सुभाष देवकर, पोपट झेंडे, सागर पाटील, नितीन खरात, आनंदराव देसाई, अमित शिंदे, सुरेश पाटील, अनिल देसाई, पोपट माने, श्रीरंग मोरे, भारती मोरे, शशिकांत मोरे, नंदा मोरे, रंजना मोरे, संगीता मोरे, मंदा मोरे, मालती मोरे आदिंची उपस्थिती होती. प्रमोद पाटील यांनी पास्ताविक तर सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments

Powered by Blogger.