दुधात भेसळ; संकलन केंद्रावर पोलिसांचा छापा


कराड : सातारा जिल्ह्यातील शेरे (ता. कराड) येथे दूध भेसळ करणाऱ्या संकलन केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दूध भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यासह मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. अन्नभेसळ विभागाच्या मदतीने पोलिसांनी ही कारवाई केली.

 खास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि.८ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास डीवायएसपी नवनाथ ढवळे व पोलिस पथकाने शेरे येथे दूध संकलन केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.

दूध केंद्रामध्ये दररोज सुमारे सातशे ते आठशे लिटर दूध संकलन केले जाते. परंतु, संकलन केलेल्या दुधामध्ये भेसळ करून केंद्र चालक पुढे मोठ्या दूध संघाला बाराशे ते तेराशे लिटर दूध पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दूधात भेसळ करण्यासाठी केंद्र चालकाकडून युरियाची पोती, तेलाचे डबे तसेच पावडर यांचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

No comments

Powered by Blogger.