लोंबकळणाऱ्या विद्युत तारेमुळे डंपर जळून खाक


सातारा : गोंदवले खुर्द येते वनराज ढाबा समोर रस्तेचे काम चालू असताना वर लोंबकळत असलेल्या विद्युत तारेला चिकटल्याने डंपर जाग्यावर जळून खाक झाला. या घटने मुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गोंदवले खु. येथील वनराई ढाब्या समोर सातारा पंढरपुर रस्त्याचे काम सुरु होते. मुरमाचा डंपर रस्त्यावर खाली करताना विजवाहक तारेला चिकटल्याने ढपरला आग लागली. या आगीत डंपरची चाके चळाली व डंपरचे लाखो रुपयाचे नुसकान झाले या आगीत जिवीत हानी झाली नाही. आग विझवण्यासाठी म्हसवड न.पा.ची अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहचली.

ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्येय यानिमित्ताने पुढे आला. याच ठेकेदारांच्या चुकीने गत वर्षी एक जेसीबीचा चालक ही दगावला असल्याची माहिती पुढं आली आहे.

कोणतीही खबरदारी न घेता सुरू असलेल्या या कामामुळे आज सुदैवाने एका डपंर चालकाचे प्राण वाचले.

No comments

Powered by Blogger.