वर्येजवळ वाहनाच्या धडकेत युवक ठार


कण्हेर : सातारा-पुणे जुना हायवेवरील वर्ये पुलानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. नुने येथील अरुण महादेव जाधव (वय 34, मूळ गाव खीरखंडी) असे या युवकाचे नाव आहे.गुरुवारी ही दुर्घटना घडली असून अरुण जाधव गंभीर जखमी झाला होता.

त्याचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे. त्याच्या निधनाची माहिती मिळताच मोळाचा ओढा व शाहूपुरी परिसरातील युवकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

No comments

Powered by Blogger.