मायणीच्या श्री संत सरुताईंचा रथ सोहळा संपन्न


मायणी : असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मायणीच्या श्री संत सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित रथ सोहळा भक्तीमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आज पहाटे ४ वाजून ३२ मिनीटांनी हजारो भाविकांचे उपस्थितीत मातोश्री सरुताई माऊली यांच्या समाधीवर फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ह.भ्.प.विजय महाराज लोणीकर यांचे काल्याचे किर्तन व रिंगण सोहळा संपन्न झाला. दुपारी १२वांजता माजी आ.डॉ. श्री.व सौ. दिलीप येळगांवकर यांचे हस्ते रथ पूजन व महाआरती झाली. सदर वेळी सरपंच सचिन गुदगे, उपसरंपच सूरज पाटील, ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर, ह.भ.प. पांडुरंग लोहार सर विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. नंतर फुलांनी सजविलेल्या रथातून माऊली सरुताईंच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. 

रथापुढे मिरवणूकीत झांज,गजी पथक, घोडे, उंट,भजनी मंडळ आदींचा सामावेश होता. ठिकठिकाणी भाविक अत्यंत भावपूर्वक रथावर देणगी अर्पण करीत होते. रात्री उशीरा रथ ग्रामप्रदाक्षिणा करुन मठामध्ये आला.

मठ परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

मायणी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष गोसावी व त्यांचे सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रथसोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

No comments

Powered by Blogger.