गुप्तांगावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न


सातारा : जिल्हा सरकारी रुग्णालयातील प्रिझन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या बलात्कार गुन्ह्यातील संशयित आरोपीने स्वतःचे गुप्तांग कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली असून जखमीवर उपचार सुरू आहेत. 

शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.निलेश पितांबर शिंदे रा.तासगांव असे आरोपीचे नाव असून १५ दिवसांपूर्वी महिलेवर बलात्कार केला असल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. संशयिताने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने काचेच्या बाटलीने स्वतःचे गुप्तांग कापले. शनिवारी रात्री अचानक घडलेल्या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

No comments

Powered by Blogger.