विडणी येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यास आय.एस.ओ.मानांकन


जावली : विडणी येथिल पशुवैद्यकीय दवाखान्यास आय.एस.ओ.मानांकन मिळाल्याबद्दल दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंञी महादेवजी जानकर यांची सदिच्छा भेट देऊन दवाखान्याच्या कामकाज बाबत समाधान व्यक्त केले.

विडणी ता.फलटण येथिल पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ यांस आय,एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याने दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंञी महादेवजी जानकर यांनी दवाखान्यास सदिच्छा भेट घेऊन दवाखान्याची पाहणी करुन कामकाजाची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सी.टी.भोसले यांनी दिली.पशुवैद्यकीय विभागाचे वैद्यकिय अधिकारी यांनी चांगल्या पध्दतीने योगदान देऊन सर्वानी युनिटीने काम केल्याने या विभागाचा भारतात नंबर आल्याचे मत जानकर यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विनोद पवार.डॉ.संदिप भुजबळ डॉ चंद्रशेखर भोसले,.डॉ.दिपक नाझनिकर.डॉ.जयकुमार फडतरे. डॉ.इंगवले.डॉ.सुरेश गावडे राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ.उत्तमराव शेंडे अँड.साहेबराव जाधव जिल्हा कार्यकारणीचे सदस्य काशिनाथ शेवते. जिल्हा प्रवक्ते संतोष ठोंबरे.महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुवर्णा नाळे.महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष कल्पना गिड्डे, बबनराव शेंडे केशवराव नाळे.शरद नाळे.लक्ष्मण भुजबळ सुभाष अभंग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक सावतामाळी मंदीर सभागृहात घेतली यावेळी डॉ.उत्तमराव शेंडे यांनी स्वागत करुन गावातील रस्ते डांबरीकरण,विडणी पाझर तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडण्यासाठी निवेदन देऊन मागणी करणेत आली.याबाबत संबधित अधिकारीची चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन महादेवजी जानकर यांनी दिले.

तसेच फलटण तालुक्यात पशुधन संख्या जादा असल्याने पशुवैद्यकीय दवाखाना संख्या १३ असून यामध्ये वाढ करावी अशी लोकांनी मागणी केली असता फलटण तालुक्यात आठ दवाखान्याची मंजूरी दिली असून यामध्ये फरांदवाडी व आदर्की या ठिकाणी दवाखाना मंजूरी मिळाली असून आदर्की येथिल ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुन न दिल्याने तो दवाखाना वाई किंवा खंडाळा तालुक्यात वर्ग करणार असल्याचे सांगून फरांदवाडी येथिल दवाखाना मिनिपॉली क्लिनिक असून या ठिकाणी रक्त लघवी एक्सरे आदींची तपासणी करणेत येणार असून जनावरांच्या विविध आजारावर उपचार या ठिकाणी केले जातील असे सांगितले.

जानकर पुढे म्हणाले की पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर कडून पशुपालकांना पशुपालन,कुक्कुट पालन,मत्स्य पालन कसे करावे या विषयी ट्रेनिंग दिले जाईल तसेच जनावरां पासून होणारे आजार याचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी पशुपालकांना लसीकरण केले जाईल तसेच पूर्वी जनावरांच्या तपासणी जिल्ह्याच्या ठिकाणी होत असत आता प्रत्येक तालुक्यात तपासणी केद्र सुरु करत आहे.

यामुळे पशुपालकांचा वेळ व आर्थिक खर्च यांची बचत होणार असून तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधेसह मोबाईल व्हँन (फिरता दवाखाना )सुरु करणार असून यामुळे पशुपालकांना डॉक्टरांना फोन करुन जनावरांच्या आजाराची माहिती दिल्यास थेट पशुपालकांच्या दारात डॉक्टर जाऊन सेवा दिली जाणार असल्याचे सांगितले.

No comments

Powered by Blogger.