Your Own Digital Platform

विक्रमबाबा पाटणकर यांना अटक करा


सातारा : पाटण तालुका कृषी अधिकाऱ्यांना मारहाण करणारे विक्रमबाबा पाटणकर व सहकाऱ्यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, पाटणकर यांना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा संघटना प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे दिला.

पाटण तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत विक्रमबाबा पाटणकर व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या श्रीमुखात लगावली होती. घटनेचा निषेध करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी मोर्चा काढला. मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात कृषी विभागात असंतोष पसरला आहे. तसेच पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होवूनही अद्याप पाटणकर व सहकाऱ्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनांचे प्रमाण वाढू शकणार आहेत. त्यामुळे तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.