Your Own Digital Platform

खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका


सातारा : येथील भूविकास पेट्रोल पंपापासून कूपर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. भूविकास बॅंकेपासून काही आंतरावर रस्त्यात केवळ मुरूम टाकून थातूर-मातूर उपाय करण्यात आले आहेत.

परंतु, सपाटीकरण न केल्यामुळे रस्त्यात अनेक उंचवटे आहेत. मोठ्या बसेस याठिकाणावरून जात असताना दुचाकीस्वार घसरून पडल्यास अपघात होण्याची शक्‍यता आहे. तसेच जुन्या आरटीओ चौकापासून कूपर कॉलनीकडेही मोठाले खड्डे आहेत. खड्डे चुकवण्यासाठी अनेक दुचाकीस्वार चक्क उजव्या बाजूला येतात. या नादात समोरून येणाऱ्या वाहनाशी धडक होण्याची शक्‍यता आहे. संबंधित विभागाने याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे.