‘ती’ वाघ नखे कोल्हापूरमधील


कराडः कराड तालुका पोलिसांनी जप्‍त केलेली वाघ नखे कोल्हापूर जिल्ह्यातून आणण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.

शुक्रवारी वडगाव हवेली (ता. कराड) येथे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी अवधूत जगदीश जगताप (वय 18, रा. खुबी) याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडून सुमारे 5 लाख रुपयांचे वाघ नखे जप्त केली आहेत. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार जप्त केलेली नखे ही वाघाचीच आहेत.

 नखे सापडली असल्याने वाघाची शिकार झाली आहे का ? याबाबतही आम्ही तपास करत आहोत. प्राथमिक तपासात संशयितांनी कोल्हापूर जिल्ह्यातून वाघ नखे आणल्याचे सांगितले असून त्याची खात्री केली जात आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.