Your Own Digital Platform

मायणीच्या सरुताई माऊलींच्या ६ व्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ


मायणी : आज बुधवार दि. २६ पासून सरुताई लिलामृत या ग्रंथाच्या पारायणाने श्री संत मातोश्री सरताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने  दि. २७ रोजी ह.भ.प. सिताराम माळी महाराज, कुर्डूवाडी यांचे किर्तन, दि. २८ रोजी ह.भ.प. बाल किर्तनकार ह.भ.प. कु. शिवालिला पाटील, बार्शी यांचे किर्तन व स्वरगंधार अंध मुलांचा गायनाचा कार्यक्रम, तुंग (महेश नवाळे), दि. २९ रोजी ह.भ.प. गणेश महाराज डांगे, विहापूर यांचे किर्तन व ओंकार कल्चलर गुप, विटा यांचा मंगळागौर कार्यक्रम.

दि. ३० रोजी पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम, पहाटे ५वांजता ओम दत्त चिले महाराज भजनी मंडळ, कोळेवाडी ता. कराड यांचा भजनाचा कार्यक्रम, सकाळी१०ते १२ह.भ.प. विजय महाराज लोणीकर यांचे काल्याचे किर्तन होईल.

सकाळी ११वांजता माजी आ.डॉ. श्री.व सौ. दिलीप येळगांवकर यांचे हस्ते रथ पूजन होऊन रथ सोहळा व पालखी सोहळा संपन्न होणार आहे. तसेच ह.भ.प. श्री गुरु मुगुटराव काका पालखी दिंडी सोहळा या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. दिंडी मालक ह.भ.प. लक्ष्मण महाराज बापू किरोली यांच्या नेतृत्वाखाली रिंगण सोहळा संपन्न होणार असून हा अश्वारिंगण सोहळा शैलेश माने रहिमतपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. दुपारी बारा वांजलेपासून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

मायणी- पंढरपूर रोडवरील श्री संत मातोश्री सरूताई माऊली यांच्या मठामध्ये सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ६ वांजता पाद्यपूजा व अभिषेक, सकाळी ७वांजता आरती, सकाळी ९वांजता नामस्मरण व आरती, सकाळी ९ते १२ सरुताई ग्रंथाचे पारायण व नामस्मरण, दुपारी १२वांजता आरती, दु. १ते ४ माहिला भजनसाधना, दु. ४ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम, सायं.६ते ७ हरिपाठ, रात्री ९ते ११ किर्तन.
मातोश्री सरुताईच्या मठावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.