Your Own Digital Platform

काले ग्रामस्थांच्या पहिल्या लढाईला यश


सातारा : कालेतील ग्रामस्थांनी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांची भेट घेतली. तब्बल दोन तास डॉ. अनिल पाटील यांनी केली ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा केली.

डॉ. अनिल पाटील यांनी काले गावामध्ये रयत शिक्षण संस्था स्थापनेचा केला इतिहास मान्य व ग्रामस्थांच्या नवीन इमारतीच्या मागणीला 40 लाख व 10 लाख इतर देणगीदाराकडून अशी 50 लाखाच्या इमारत बांधकाम मास त्वरित मंजुरी दिली आहे. महत्वाचं म्हणजे नवीन इमारतीचे भूमिपूजन रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या सुरुवातीला 4 ऑक्‍टो. 2018 रोजी काले येथे होईल व इमारत बांधायला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. या वेळी काले येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.