कोयना व कृष्णा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना


सातारा : कोयना व कृष्णा नदी काठावरील सर्व लोकांना कळविणेत येते की, आज अखेर झालेल्या चांगल्या पावसामुळे कोयना धरण हे 99 टक्के भरलेले आहे. दि. 1 सप्टेंबर 2018 रोजीचा पाणीसाठा 104.17 टीएमसी इतका आहे. सध्या धरणाची साठवण क्षमता अत्यल्प राहीली आहे.

त्यामुळे या पुढे धरणातुन पाण्याचा विसर्ग सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. सबब धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी, सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात नदीपात्रात प्रवेश करु नये, वीज मोटारी इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यावी. असे आवाहन कुमार पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.