गणेशोत्सव व मोहरम शांततेत पार पाडा- सपोनि गिरीष दिघावकरसो


लोणंद : आगामी गणेशोत्सव आणि मोहरम सनाच्या पार्श्वभूमीवर तसेच मागील वर्षीचे गणराया अॅवार्ड वितरण करण्यासाठी लोणंद पोलिस ठाण्याच्या वतीने लोणंद येथील अमृता मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

गणेशोत्सव आणि मोहरम हे सण एकत्र मिळुण आले आहेत त्यामुळे हे दोन्ही सण ऊत्साहात साजरे करतानाच ते शांततेत आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन साजरे करावेत असे आवाहन लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीसनिरिक्षक गिरीष दिघावकर यांनी केले. 

गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येथील शांतता कमीटी, लोणंद पोलिस स्टेशनची महीला दक्षता कमीटी, फलटण, खंडाळा तालुक्यातील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, व्यापारी वर्ग, स्थानिक पातळीवरील वरीष्ठ नेते, दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावचे पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दले, सामाजिक कार्य करत असणाऱ्या संघटना, यांची बैठक लोणंद ता. खंडाळा येथीलअमृता मंगल कार्यालयामधे आयोजीत केली होती त्यावेळी सपोनि दिघावकर बोलत होते. 

याच कार्यक्रमात गतवर्षीच्या गणराया अॅवार्ड 2017 चे वितरण करण्यात आले. व खंडाळा व फलटण तालुक्यातील पोलिस पाटील संघटने कडून सपोनि गिरिश दिघावकर आणि पोउनि गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ग्राम सुरक्षा दलांच्या कार्यकर्त्यांना लोणंद पोलिस स्टेशनच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. 

या कार्यक्रमास लोणंदच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके , नगरसेविका शैलजा खरात, नगरसेवक हणमंत शेळके, किरण पवार, एमएसईबी चे बोरसे,पोलिस पाटील संघटनेचे गाढवे सुरेश चव्हाण, शिवाजीराव शेळके मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद महीला दक्षता समितीच्या शैलजा खरात डॉ. स्वाती शहा,अरोरा मॅडम,, आदी मान्यवर उपस्थित होते.

गणराया अॅवार्ड 17 चे ग्रामीण भागातील विजेते पुढिल प्रमाणे -

प्रथम अजिंक्य गणेशोत्सव मंडळ तरडगाव

द्वितीय शिवशक्ती मित्र मंडळ सुखेड

तृतिय बाबीरदेव गणेशोत्सव मंडळ शेरेचीवाडी

लोणंद शहर गणराया अॅवार्ड 17 चे विजेते पुढिल प्रमाणे.

प्रथम क्रमांक हणमंत गणेशोत्सव मंडळ लोणंद

द्वितीय क्रमांक स्टेशनचौक गणेशोत्सव मंडळ लोणंद

तृतीय क्रमांक व्यापारी गणेशोत्सव मंडळ लोणंद

No comments

Powered by Blogger.