विडणीमध्ये अपघातात तीन भावांचा मृत्यू


विडणी : महाड पंढरपूर विडणी, ता. फलटण येथे मार्गावर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय रामचंद्र नाळे (वय २३) राहूल रविंद्र नाळे (वय २३) व अमित बबन नाळे ( वय २२) सर्व रा. विडणी ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपरद येथे जिमसाठी सकाळी साडेपाच वाजता तिघेजण घरातून बाहेर पडले होते. 

 महाड - पंढरपूर राज्य मार्गावर हे तरुण आले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातानंतर संबंधित वाहनधारक फरार झाला. एवढेच नाही तर त्या वाहनधारकाने त्या तरुणांचे मृतदेह रस्त्याच्या बाजूला ठेवून दिले. या घटनेमुळे विडणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर गावावर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीतील हे तीन तरुण गेल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांमधून संबंधित वाहनधारकाला अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

No comments

Powered by Blogger.