Your Own Digital Platform

स्वाईन फ्लू बाबत आरोग्य विभागाने सतर्क रहावे: शिवरूपराजे
पंचायत समिती मासिक सभेत आरोग्य विभागाला झाडले

स्थैर्य, फलटण: सातारा जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू मुळे दोघाजणांचा बळी गेले आहेत.तर त्या बाबत आरोग्य विभागाने सतर्क राहावे असा आदेश फलटण पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर-निंबाळकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिले आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे व संजय कापसे यांनी तालुक्यात डेंग्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आरोग्य विभाग जागा झाला तसा स्वाईन फ्लू मुळे बळी गेल्यावर आरोग्य विभाग जागा होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्या वेळी पंचायत समितीचे उपसभापती यांनी आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करावे असे आदेश दिले.