Your Own Digital Platform

शिवसेनेत राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व : मुलाणी


म्हसवड :
शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त म्हत्त्व देते. शिवसेनेचे पदाधिकारी विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत आहे, असे प्रतिपादन माण तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी केले.

म्हसवड येथे शिवसेनेच्या वतीने व विश्वकर्मा कामगार युनियनच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचा महामेळावा म्हसवड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलाणी बोलत होते.
कोरेगाव संपर्क प्रमुख विश्वासराव साळुंखे, रंगकामगार सेनेचे अध्यक्ष धनाजी, शिवसेना शहरप्रमुख राहुल मंगरूळे, विभाग प्रमुख शिवदास केवटे, युवासेना शहरप्रमुख सोमनाथ कवी, कुकुडवाड विभाग प्रमुख आंबादास शिंदे, आंबादास नरळे, विश्वकर्मा कामगार युनियनचे अध्यक्ष अमोल कुंभार, सचिव संतोष गायकवाड, संचालक अनिल पाटील उपस्थित होते.

मुलाणी म्हणाले, शिवसेनेचे पदाधिकारी ज्या शासकीय कमिटीवर काम करतात, त्याठिकाणी सामान्य माणसाला शासनाच्या योजनांचा फायदा मिळवुन देतात. त्याचाच एक भाग म्हणून असंघटीत व अकुशल कामगार असलेल्या गवंडी, सुतार, रंगकामगार, प्लंबर, बिगारी, इत्यादी मजुरांना शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ व सोयी-सुविधा देण्यासाठी शिवसेना अग्रेसर असते. मजुरांच्या मुलानां शैक्षणिक क्षेत्राबरोबर आरोग्य विमा, अपंगत्व व अपघाती मृत्यू अशा एक ना अनेक शासनाच्या योजना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, विश्वकर्मा कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. सुत्रसंचालन राहुल मंगरूळे यांनी केले तर आभार शिवदास केवटे यांनी केले.